बॉलीवुड

“बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली

श्रेया घोषाललाने IIFA पुरस्कार सोहळ्यातील तिचा आणि शाहरुख खानचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहरुखने श्रेयाला पाहताच जे काही केलं त्याच्या या कृतीचं सर्वांनी कौतुक केलं आहे. या व्हिडीओने सर्वांची मने जिंकली आहेत

राजस्थानच्या जयपुरमध्ये नुकतेच सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी IIFA Awards 2025 मध्ये दिसले. 8 मार्च पासून सुरु झालेला हा पुरस्कार सोहळा 9 मार्च रोजी रात्री संपला. या दरम्यान, अनेक सगळेच कलाकार तिथे दिसले. यावेळी कार्यक्रमात सगळ्यात सुंदर आवाजाचा पुरस्कार हा श्रेया घोषालला मिळाला. तसेच श्रेयानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओची सगळ्यात जास्त चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण सर्वांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडीओ आहे तिचा आणि शाहरूख खानचा.

श्रेया घोषालनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी हे शाहरुखचे फोटो काढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे श्रेया ही एका ठिकाणी उभी राहून त्याच्याकडे बघताना दिसतेय. त्यानंतर शाहरुख जेव्हा श्रेयाला पाहतो तेव्हा तो पापाराझींच्या गर्दीतून तिच्या दिशेनं येतो. श्रेयाला मिठी मारतो. श्रेयानं हा व्हिडीओ शेअर केला.

“माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण”

हा व्हिडीओ शेअर करत श्रेयानं कॅप्शन दिलं आहे की “माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण. त्याच्या नम्रतेचं आणि प्रेमाचं नेहमीच कौतुक होतं, मेगा स्टार शाहरुखवर सगळे याच कारणासाठी प्रेम करतात. आयफाच्या ग्रीन कार्पेटवर त्यानं मला मिठी मारली आणि आशीर्वाद देत म्हणाला, “बेटा तू कशी आहेस”, ही माझी सगळ्यात चांगली आठवण आहे. माझ्या करिअरची सुरुवात ही 23 वर्षांपूर्वी शाहरूखच्या देवदास या चित्रपटापासून झाली. राजस्थानमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्या ठिकाणी मी लहाणाची मोठी झाले आज 25 वर्षांनी हे संपूर्ण झालं आहे असं म्हणता येईल. देवाचे, माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि माझ्या चाहत्यांचे आभार.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button