बॉलीवुड

शाहरुख खानवरचं ते संकट टळलं, अखेर ती केस जिंकलाच; काय होतं नेमकं? Shah Rukh Khan Tax case: २०११मध्ये शाहरुख खानवर एक केस करण्यात आली होती. आता केसचा निकाल हा शाहरुख खानच्या बाजूने लागला आहे.

अभिनेता शाहरुख खानने प्राप्तिकर अधिकाऱ्यांसोबतच्या सुरु असलेल्या वादात विजय मिळवला आहे. आयटीएटीने शाहरुखच्या बाजूने निकाल दिला आहे. हा वाद २०११मध्ये प्रदर्शित झालेल्या रावण या चित्रपटाच्या कराशी संबंधीत होता. प्राप्तिकर विभागाने 2011-2012मध्ये शाहरुख खानने रावण सिनेमातून कमावलेल्या 83.42 कोटी रुपयांच्या घोषित उत्पन्नावर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच ब्रिटनमध्ये भरलेल्या करांसाठी परदेशातील कर क्रेडिटचा दावा नाकारला होता. चार वर्षांहून अधिक काळानंतर, विभागाने शाहरुखचा कर 84.17 कोटी रुपये असल्याचे सांगितले.

आयटीएटीने निकाल दिला की आयकर विभागाने केसचे पुनर्मूल्यांकन करणे कायदेशीररित्या योग्य नाही. चार वर्षांच्या कालावधीनंतरही आवश्यक असलेले कोणतेही नवीन ठोस पुरावे सादर करण्यास मूल्यांकन अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. ITAT ने म्हटले आहे की प्राथमिक चौकशी दरम्यान या प्रकरणाची आधीच तपासणी केली गेली आहे, त्यामुळे पुनर्मूल्यांकनाची कार्यवाही एकापेक्षा जास्त प्रकरणांवर कायद्यानुसार चुकीची आहे.

शाहरुख खानने रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत केलेल्या करारानुसार, चित्रपटाचे 70 टक्के चित्रीकरण यूकेमध्ये करायचे होते आणि त्यामुळे त्याच्या उत्पन्नाच्या समान टक्केवारी यूके च्या कराच्या अधीन असेल. आयटी विभागाने असा युक्तिवाद केला की अशा व्यवस्थेमुळे भारताचा महसूल बुडाला आहे आणि अधिकाऱ्यांनी त्यांचा विदेशी कर क्रेडिटचा दावा ही स्वीकारला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button